#

“झेंडे हॉस्पिटल" च्या आधुनिक उपचारामुळे अपत्य प्राप्ती झालेले जोडपे ह्यांनी हॉस्पिटलला सदिच्छा भेट देऊन डॉक्टरांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले. ह्या पेशंटला आपत्य प्राप्ती होत नव्हती. पुण्याच्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये २ वेळा उपचार घेऊन सुद्धा तिला यश आले नव्हते. तिला “झेंडे हॉस्पिटल" बद्दल माहिती मिळाली. त्यानुसार तिची laparoscopy तपासणी करण्यात आली त्यामध्ये तिला पोटाचा टी.बी. असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार तिला उपचार देण्यात आले. अनेक प्रकारच्या अडचणी आल्यामुळे ते जोडपे निराश झाले. परंतु पेशंटचे डॉक्टरांवरील विश्वासामुळे ते पुन्हा उपचार घेण्यास तयार झाले त्यांना IVF चा सल्ला देण्यात आला.

IVF च्या उपचारासाठी त्यांनी होकार दिला. त्यानुसार आम्ही उपचार सुरु केले. गर्भ आम्ही डे ३ ला ते गर्भ ट्रान्सपर केले ज्याने तिला गर्भ राहिले. त्यात तिला ९ व्या महिन्यात कोविड झाला त्यामुळे तिला कोविड प्रतिबंधात्मक उपचार असलेल्या हॉस्पिटलमध्येच तिला ऍडमिट करावी लागली तिथेच तिची सिझेरियन करुन डिलेव्हरी करण्यात आली. बाळ व आई दोघेही सुखरूप आहेत. हे आम्हाला फोन वरुन कळवण्यात आले. “झेंडे हॉस्पिटल" च्या उपचारामुळे अपत्य प्राप्ती झाली परंतु कोविड मुळे डिलेव्हरी दुसऱ्याच हॉस्पिटलमध्ये झाल्याने व मागील बराच काळ हा कोरोनाचा असल्याकारणाने त्यांना हॉस्पिटलला भेट देणे शक्य झाले नाही. त्यासाठी ते आता येऊन डॉक्टरांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले.

सांगण्याचे कारण कि बऱ्याच पेशंटला अश्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागते त्यांना योग्य उपचार पद्धती मुळे होणारा फायदा व डॉक्टरांवरील असलेला विश्वास ह्यामुळे यश प्राप्ती होते. अश्याच अनेक प्रश्न “झेंडे हॉस्पिटल अँड डॉ. झेंडेज टेस्ट ट्युब बेबी सेंटर” येथे सोडवण्याचे प्रयत्न केले जातात. म्हणुन आपल्या जवळील अथवा नातेवाईकांमध्ये अश्या स्त्रियांना एकदा झेंडे हॉस्पिटलचा सल्ला अवश्य घेण्यास सांगावे हि नम्र विनंती.