#

“झेंडे हॉस्पिटल" मध्ये अनेक विविध प्रकारच्या आव्हानात्मक केसेस येत असतात. त्याची चर्चा आपण फेसबुक व इंस्टाग्राम वर करताच असतो. आज देखील अश्याच एका केस बद्दल माहिती जाणुन घेणार आहोत. वंध्यत्व उपचारामध्ये प्रत्येक रुग्णाला IVF उपचाराचीच गरज भासतेच असे नाही. काही वेळा काही रुग्णांना laparoscopy, IUI द्वारे देखील यश मिळू शकते. त्याबद्दलच ही माहिती. रुग्णाच्या लग्नाला ५ वर्ष झालेली. रुग्णाला lean pcos ची समस्या होती. lean pcos चा अर्थ रुग्णाची शरीरयष्टी पातळ असते व तिची पाळी अनियमित असते. ज्यामध्ये हार्मोनल इन बॅलन्स असल्याने तिला ovulation होत नसते. गोळ्या देऊन सुद्धा अशा रुग्णांना ovulation होत नसते.

अशा रुग्णांना लेप्रोस्कोपी करणे व इंजेकशन देणे हा पर्याय असतो. त्याबद्दलच ही माहिती. बरेच प्रयत्न करून सुद्धा अपयश येत असल्याने ती “झेंडे हॉस्पिटल" मध्ये उपचारासाठी आली. तपासणी अंती तिला आम्ही लेप्रोस्कोपी चा सल्ला दिला. ती त्यालातयार झाली. त्यात तिच्या अंडकोशाला polycystic ovary हा आजार होता. त्याला आम्ही ovarian drilling द्वारे उपचार केले. त्यासोबतच तिला इंजेकशन व गोळ्यांद्वारे उपचार करण्यात आले. पहिल्या वेळी (cycle) यश नाही आले. दुसऱ्या वेळी (२ cycle) ला आम्ही super ovulation हा प्रोटोकॉल वापरला. त्यामध्ये तिचे २ बीज तयार झाले. IUI या प्रोसिजर मध्ये रुग्णाचे semen प्रोसेस करुन तिच्या गर्भ पिशवीत सोडले जाते. या वेळी तीला यश आले. तिला जुळे गर्भ राहिले (twin pregnancy) म्हणतात. २ बाळ असल्याने तिची जास्त काळजी घेण्यात आली. तिसऱ्या महिन्यामध्ये तिला टाका घालण्यात आला. ५ व्या महिन्याच्या सोनोग्राफी मध्ये बाळ व्यवस्थित होते. ८ व्या महिन्यात तिला कळा सुरु झाल्या २ हि बाळ पायाळु असल्याने तिचे सिझेरियन द्वारे डिलेव्हरी करण्यात आली दोन्ही बाळ २.५ किलो - २.५ किलो चे असुन अगदी व्यवस्थित आहेत.

सांगण्याचे कारण कि बऱ्याच पेशंटला अश्या अनेक सोप्पा व योग्य उपचार पद्धती ने आई होण्याचे स्वप्न “झेंडे हॉस्पिटल अँड डॉ. झेंडेज टेस्ट ट्युब बेबी सेंटर” केले जातात. म्हणुन आपल्या जवळील अथवा नातेवाईकांमध्ये अश्या स्त्रियांना एकदा झेंडे हॉस्पिटलचा सल्ला अवश्य घेण्यास सांगावे हि नम्र विनंती.