#

“झेंडे हॉस्पिटल" मध्ये अनेक विविध प्रकारच्या आव्हानात्मक केसेस येत असतात. त्याची चर्चा आपण फेसबुक व गुगल बिझनेसच्या माध्यमातून करतच असतो. आज देखील अश्याच एका केस बद्दल माहिती जाणुन घेणार आहोत. पेशंटच्या लग्नाला ५ वर्ष झाली होती. अनेक दवाखाने फिरुन सुद्धा त्यांना अपत्यप्राप्ती होत नव्हती. शेवटी त्यांना उपचारासाठी “झेंडे हॉस्पिटल" बद्दल माहिती मिळाली. उपचारासाठी ती “झेंडे हॉस्पिटल" मध्ये दाखल झाली. तपासणी मध्ये असे आढळून आले कि तिच्या अंडकोशाची (ovarian reserve) क्षमता हि खूप कमी आहे. त्यामुळे तिला वंध्यत्वाची समस्या भेडसावत होती. पेशंटच्या संपूर्ण तपासणी नंतर आम्ही तिला IVF चा सल्ला दिला.

पेशंटच्या पतीचे शुक्राणूंची संख्या (Semen analysis) male factor infertility हा योग्य होता. पहिल्या सायकलला तिला दुर्दैवाने प्रेग्नन्सी राहिली नाही. दुसऱ्यांदा तिचे योग्य मार्गदर्शन करून तिला अंडकोशाची बीज तयार करण्याची क्षमता कमी असल्याने कुठल्या प्रकारच्या अडचणी येऊ शकतात ह्या बद्दल मार्गदर्शन करून मासिक पाळीच्या दोन phases असतात त्या दोन्ही वेळी stimulate केले जाते व ते गर्भ फ्रीझ केले जातात. हे तिला पटवून दिले. आम्ही हे stimulation वापरून तिचे गर्भ तयार केले व ते गोठवून ठेवले . पुढील महिन्यात डे ३ ला ते गर्भ ट्रान्सफर केले त्यात तिला प्रेग्नन्सी राहिली. नंतर तिची ९ महिन्यापर्यंत योग्य ती काळजी घेण्यात अली. ९ व्या महिन्यात सिझेरियन द्वारे तिची डिलिव्हरी करण्यात आली. ज्यामध्ये आई व बाळ सुखरुप आहेत. सांगण्याचे तात्पर्य हे आहे कि dualstimulation द्वारे IVF ने तिला यश प्राप्त करू देऊ शकलो. सहसा dualstimulation चा वापर अहमदनगर जिल्ह्यात कोणी करत नाही. Dualstimulation जास्त वापर हा पुणे - मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये केला जातो. तीच उपचार पद्धती हि “झेंडे हॉस्पिटल" उपलब्ध आहे.

सांगण्याचे कारण कि आपल्या पैकी असंख्य स्त्रियांना अपत्य प्राप्तीचे स्वप्न असते परंतु अनेक शारीरिक अडचणींमुळे अपत्य प्राप्तीचे स्वप्न अर्धवट रहाते. आधुनिक उपचार पद्धतीने अपत्य प्राप्तीचे स्वप्न पूर्ण करू शकतो. हे तुम्हाला “झेंडे हॉस्पिटल अँड डॉ. झेंडेज टेस्ट ट्युब बेबी सेंटर” येथे उपचार घेतल्यानंतर खात्री होईल. म्हणुन आपल्या जवळील अथवा नातेवाईकांमध्ये अश्या जोडप्यांना एकदा झेंडे हॉस्पिटलचा सल्ला अवश्य घेण्यास सांगावे हि नम्र विनंती.